आठवणींच्या जगात पाय ठेवला आणि ह्यावेळी भेटली ती काही नाती ...
हरवून गेलेली ...
कुणाच्या ह्या जगातून जाण्यामुळे काळाच्या ओघात हरवलेली...
तर काही गैरसमजामध्ये गुरफटून मला चिडवणारी ...
काही जुन्या गावची... काही जुन्या घरची ....
काही जुळून येण्याआधी निसटून गेलेली .....
काही मी तोडून टाकलेली , आणि काही समोरून नाहीशी झालेली ....
काही सुखावणारी , काही दुखावणारी ...
पण दुखावणारी असली तरी हवीहवीशी ... हसरी दुःखं जशी ...
काही क्षणात जमलेली , आणि काही वर्षानुवर्ष असूनही विरून गेलेली ...
काही आता फक्त आठवणीतच भेटतील अशी ...
आणि काही धूळ झटकून नव्यानी फुलवता येतील अशी ...
काय करावं बरं ? हव्याहव्याश्या हसऱ्या दुख्खांना तसा धुळीतच पडून दयावं ... की नव्या उमेदीने त्यांना आपलंसं करावं ?
हळुवार , नाजूक नाती तर कायम मनाला आनंद देतीलच ...
पण मनात टोचत राहणाऱ्या ह्या नात्यांचा काय करावं बरं....?
इतकी वर्ष उलटून गेली , मी त्यांना तसंच ठेवून दिला ...गुंता वाढवला...
आता तोः सोडवणं , त्याला नाव देणं कठीण झालंय. ...
एकदा वाटलं , जाऊदेत , कुठे आता पुन्हा .... ती कटकट , ते रुसणं , ती मनधरणी
पण मग दिसली काही नाती ... ज्यांनी मला आयुष्य भरभरून जगायला शिकवलं ...
ज्यांनी आला दिवस हसून जगायची युक्ती शिकवली ...
ज्यांनी निरपेक्ष प्रेम करून तसंच करायला शिकवलं.....
माणूस आहे ... चूक होणारच की... समोरच्याची असो किंवा माझी ...
काळाच्या ओघात प्रसंग पुसट झाले ...
राहिला तोः अहंकार ...
झटकून टाकायला हवा... शोधायला हवं मी , हरवलेल्या नात्यांना ...
एकदा का हा अहंकार गळून पडला की कदाचित ही नाती प्रत्यक्षात उतरतील ,
आठवणींचं जग सोडून वर्तमानात येतील ....
आणि नाहीच आली ... तर ...
मी प्रयत्न केल्याचं समाधान कुणी कसं बरं हिरावून घेईल माझ्यापासून... :-)
16 comments:
Excellent!!!
By far the best post that you've penned so far.
"Maanus aahe.. chuuk honarach ki.. samorchyachi aso kiwwa mazi" is something everyone should imbibe in himself/herself..
Neatly written.. Simple words woven together so beautifully!
Cheers, and keep writing!
Agreed JD :)
Simple, cchan ahe.
Welcome back Sayali !
I second Jaydeep's opinion... very well written.
sundar...........
kharach mala wachatana ase watale aare he tar mazyach manatale vichar tar navet?pan kasa asate na ki ha vichhar fukta apanach karun kahi upyog nasto tychi gravity ,tya vicharane fulun alele haluwar mman samorchyala kalel janavel ase astech ase nahi na ................
Thank you all !
@Jd : yes difficult to accept mistakes but helps at times...
@Nandini , Surabhi : Thank you.
@Anonymous : kunitari suruvat karaila havi... !
mast..khup chan lihila ahes...
Forgive, don't forget!
Forgiveness helps you move on and see the person for who he/she is.
Mast lihila aahes. Love the flow of words. Feels like they are being captured as they are born in your mind :) Keep writing!
beautiful piece of writing. pratyek line sundar vatali vachtana. Really Excellent!
Keep writing..
simply awesome!!
Simply amazing Sayali!!.. Superb !!.. Shahara ala vachtana.. brilliant writeup.. Keep up the good work!!..Cheers!!
it is direct image of distilled and mature thoughts and feelings. Congratulations. Pl. keep on writting .Satish Marathe
सुखः दुखः ने विणलेली प्रत्येकाचीच एक कहाणी असते ..
कधी ती गोड तर कधी ती कडू आठवणीची शिदोरी असते .. नाही का सायली ??
सुख हसण्याच्या रुपात तर दुख अश्रूंच्या रुपात वाहत असते ..
पहिल्यांदाच केलेल्या गोष्टीचे स्पुरण आणि दुसऱ्याचं पाहून केलेलं अनुकरण असत ..
आठवण्यासारखे असे बरेच असते तर विसरण्यासारखे असे काहीच नसते ..
आयुष्याचा लघुपतावर आपणच जिंकलेलो असतो ..
कारण छान जगण्या इतपत तरी आपण शिकलेलो असतो ... :)
चीय्रस डिर...
स्नेहल अळशी .. :)
Btw - ha tuzyatalya lekhakacha kalpanavishkaar aahe ki 'sayali' la asa vatta?
Btw - ha tuzyatalya lekhakacha kalpanavishkaar aahe ki 'sayali' la asa vatta?
Mala asa vatta...ani mi asa karate... Pan praytna karun kahi ghadla nahi tar punha tya vatela jaat nahi...
Very Nice!!!... khup chaan!!...Flow khup chaan ahae..gana gatana barobar gayakane same var yava tasa...
Fab Writing!!!!... :-)
I am Avanti Puranik's friend.. Ashish Karkhanis
she introduced me to your blog... Awesomme Writing.. Heres link to my blogsite!!.. yevadha changla vagere lihit nahi... pan vachu shaktes..
www.straight-drives.blogspot.com
Post a Comment