माझ्या जुन्या घरी जाऊन आले मी आज...
आता तिथे कुणी नवीन लोक राहतात... पण हा सगळ्या जगाचा गैरसमज आहे.... :)
कारण मी गेले तेव्हा ज्या दारात , पायऱ्यांवर बसून मी आणि माझी बहिण भातुकली , "बाई -बाई " खेळायचो त्या दाराने खुणावलं मला ...
'किती दिवसांनी येतेस...मला वाटलं ह्या घराशिवाय कशी राहशील...आज ४ महिन्याने आलीस...ये .. '
माझी कुठलीही मैत्रीण तिच्या घरी जायला निघाली की ह्याच दारात मी उभी राहून तासनतास निरोप देत राहायचे...
नकळत हसायला आलं...आईची हाक सुद्धा ऐकू आली.. 'अगं कितीवेळ दारात गप्पा मारताय ...आत या..' :)
मग गेले आत...
सवयीच्या ठिकाणी ना आमचा पलंग होता , ना चप्पल stand ,ना घरी येताच स्वयंपाक घरातून बाहेर डोकावणारी आई ... ( आणि कुणी ओरडलं सुद्धा नाही ... चप्पल आत टाक )
पण माझी खिडकी होती तशीच.. :) तिच्या समोर ऐटीत डोलणारी कडूनिंबाची फांदी.. बागेत अवाच्यासवा वाढलेला कडीपत्ता ... तशीच मंद झुळूक , तशीच हवीहवीशी सकाळ...
पुढच्या एक मिनिटात मी अनेक वर्ष मागे गेले... कधी ह्याच खिडकीत परीक्षेची शेवटची उजळणी...कधी बाबा ओरडले तर बाहेर बघत रडणं...कधी गाणी ऐकत एकटक बाहेर बघणं ...कधी धो धो कोसळणारा पाउस... आणि पावसाच्या दुसर्या दिवशी अधिकच सुंदर दिसणारी अर्धी भिजलेली झाडं... :)
त्याच खिडकीत बसून दूर चालत येणारे बाबा ...आणि 'बाबा' अशी जोरात हाक मारत कोण आधी पोचतंय अशी शर्यत लावणाऱ्या आम्ही दोघी बहिणी ...जाणाऱ्या पाहुण्यांना 'टाटा' करायची हीच खिडकी..आणि कोण आलय हे बघायची सुद्धा तीच...
स्वयंपाक घरातून आईच्या हातच्या साध्या भाज्यांचे , आमटीचे वास येऊ लागले... :) तेव्हा का बरं हट्ट करायचो आम्ही...पाव भाजी हवी , पिझ्झा हवा...दाबेली हवी...?? तिथेच कडेला दिसली आमची कामवाली ताई ... दीदी म्हणायचो आम्ही तिला... आणि खरच तशीच होती , प्रत्येक दिवशी आमची तेवढीच काळजी...तेवढंच प्रेम... नोकर-मालक हे नातं कधी जमलंच नाही आम्हाला ...आईनं तिचे खूप लाड केले आणि तिने आमचे ... आज तिच्या जागी ती नव्हती आणि आईच्या जागी आई... ह्या खोलीला मी स्वयंपाकघर कस बरं म्हणू... :)
आणि मग आमच्या इवल्याश्या घरातला एक कोपरा ...आमची तिसरी खोली....बेडरूम ...ती आमच्या सगळ्यांची होती...आई बाबांची...आमच्या दोघींची...अभ्यासाची...पाहुण्यांची...computer ची.. नव्या जुन्या कपड्यांची...पुस्तकांची...मोठ्ठ्या महालात सुद्धा मावणार नाही इतका सुख , समृद्धी आणि चांगुलपणा भरलेली...
कुणाचा राग आलं , काही वाईट झाला की इथेच रडत बसायचे मी एकटी आत... आयुष्यातल्या बर्याच जाणीवा इथेच झाल्या...कळत्या वयात आणि आधीसुद्धा ... आजारी असल की इथेच झोपायचं...घरी कुणी आलं असेल तर अभ्यास इथेच... नवीन कपडे घालून आरश्यासमोर इथेच तयार व्हायचं ...इथले खूप फोटो कुठे असतील आता ? माधुरी दिक्षित , आगरकर , शाहरुख , तेंडूलकर अश्या सगळ्या फोटोंचा पण एक काळ होता... झोपता झोपता त्या फोटोकडे बघत स्वप्नात 'Interview ' देणं... :)
५ मिनिटामध्ये बाहेर पडले...पण कोण जाणे किती वर्ष पुन्हा जगली...बऱ्या-वाईट , हसर्या , दुखर्या अश्या किती गोष्टी आणि वर्ष त्या ५ मिनिटामध्ये आठवली ... दारापाशी आले आणि ठरवून टाकलं...नकोच पुन्हा यायला ...किती दुखतं इथे...!
चार पावलं चालले ...आणि अंगणात आले... ओळखीची माती ..झाडं , पटांगण , टेकडी आणि शहरीकरणाचा लवलेशही नसलेलं माझ्या घराला सामावून घेणारं fergusson चा आवार (कॅम्पस )... एका झाडामागून लहानपणीची मीच मला भेटले... तर मी गप्पं... ७-८ वर्षाची ती मुलगी मनसोक्त हुंदडत होती... हळूच लपत होती..."ishtopp ' ... असा आवाज झाला आणि हिरमुसली... निरागसपणे जाऊन राज्य घेतलं आणि शोधू लागली...
"धप्पा" .... वयानी धप्पा दिला .... माझे डोळे ढगाळले आणि पाय काही हलेना ... "येणार मी परत ... सरळ साधं जगायला आणि निरागसपणे आऊट व्हायला इथे येणार...माझ्या 'जुन्या' घरी..."
नवीन लोकं इथे राहतात असा जगाचा गैरसमज आहे...खरंच ... काळाच्या गर्दीत हरवून जाणाऱ्या माझ्या निरागसते सारख्या अनेक गोष्टी अजूनही राहतात तिथे... :)