एक क्षण रोजचा....आजचा..... अगदी कालच्यासारखा.....
घड्याळ पुढे..... पाऊल पुढे..... आयुष्य पुढे.....
वाट सरता सरत नाही ......
निसटुन जातात क्षण सरसर.....
आयुष्य हातात उरत नाही..... तरीही .......तरीही चालूच.......
गाडी चालू... ऑफिस चालू..........
सुट्टी हवी...आणि ईनक्रिमेन्ट पण!!!!
घर हवं , दागिना हवा... ईच्छा संपता संपत नाही.....!!!!
जीव उरता उरत नाही....!!!!
उठायचा , लढायचा .. स्वतःच्याच आयुष्याशी.....
हसायचं , रडायचं... स्वतःच्याच मनाशी.....
जुळवून घ्यायचं सगळं... गणितं मांडायची आयुष्याची....
नसतंच काही वेगळं.... पण माणुसकी नाही विसरायची.....
क्षण येतात , उपभोगायचे....
जातातही तसेच....आठवायचे.......
असाच आला क्षण आणि जगून घेतले शेवटचे....
आवाज , आक्रोश , रक्त , मरण .....
गोळामोळा झालाय सगळा.........
दहशतीच्या पाठीराख्यांचा....... निर्दयी खेळ सगळा.........
मेला कोण ...? जगला कोण ??? चर्चा करुन उपयोग काय ??
वेदना घेऊन जगेलच कुणीतरी.... अश्रु गाळून हाती काय??
रडायचं , मरायचं , परत परत मरण येतं,...
मरायचं, मरायचं, मातीचंच मरण होतं....
छिन्न होतं , विछिन्न होतं...
"माणूस मेला" एवढंच रहातं...
कसं मांडायचं गणित..? कसे करायचे हिशोब..??
घेऊन गेले क्षण .... बाकी रहाते शून्यं.....
आत आत पाणी पाणी...कोरडे कोरडे डोळे....
सुन्नं सुन्नं वातावरण...ढुमसणारे सुडाचे गोळे...
थांबवा कुणीतरी हे लक्तराचं जिणं.....
जपू देत की आमच्यापुरतं...आयुष्याचं लेणं....
घालायची दहशत घाला की.... करायचे स्फोट...करा की.....
निष्पापांचे खून ...तेही करा.......!
एवढं करुनही... क्षण येणार .... रोजचा...आजचा..... अगदी कालच्यासारखा..... घड्याळ पुढे..... पाऊल पुढे..... आयुष्य पुढे.....
वाट सरता सरत नाही ......
निसटुन जातात क्षण सरसर.....
आयुष्य हातात उरत नाही..... तरीही...... आयुष्यं चालुंच!!!!!!!
सायली मराठे..
9 comments:
sundar!!
Good one.. :)
impressive... I'm glad i'm still reading!
u do feel pretty strongly about the blasts....sadly there have been many more since the post....and still counting.....
राजकिय नेते, दहशतवाद संघटनांना जरब बसेल असे क्रुत्य करण्यापेक्षा एक भ्याड क्रुत्य अशी सम्भावना करने,भारताची धर्मिक एकत्मतेला धक्का लागनार नाहि अशि ग्वाहि देने,२-५ लखांची मदत जाहिर करने,मेणबत्या लावुन निर्धार व्यक्त करने,परिसंवाद भरवुन मानवी हक्कांची चर्चा करुन वेळ मारुन नेलि जाते या नेत्यांच्या भरवशावर बसले तर हा देश दहशतवादाच लाटेखाली बुडेल.
आता सर्व मतभेद बाजूला ठेवून या अतीरेक्यांचा सर्वनाश करायची वेळ आलीच आहे. एक प्रश्न मला खरच मुंबईकरांना विचारावासा वाटतो की किती दिवस " आम्ही फार सहनशील आहोत, मुंबईकरांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, मुंबई चटकन सावरली " अशा शब्दांनी हुरळून जाऊन पुढचे सोपस्कार टाळणार आहात?
का सहन करताय? काल कार्यालये आज रेल्वे अन उद्या? उद्या तुमच्या घरापर्यंत येतील हो हे नराधम. आवरा त्यांना.
रस्ता, घर, वाहन, संपत्ती सर्व प्रकारचे कर भरता तुम्ही, तो भरलाच पाहिजे अशी जाणिव तुम्हाला सरकार दुरदर्शन अन खाजगी वाहन्यांवरुन जाहिरातींद्वारे वारंवार करुन देते मग तुमच्या मनमोकळ्या जगण्याच्या आधिकाराचे, सुरक्षेचे काय? तो कर कोण भरणार?
सरकारला जाब विचारणे हा तुमचाही अधिकार ना? तो या निर्लज्ज मंत्र्या संत्र्यांवर का सोपवताय? का जाणुन घेत नाही तुमचे अधिकार? की फक्त दैनंदिन गप्पातच एकमेकाशी बोलुन सरकारला शिव्या घालायच्या? एकदा निवडुन दिलेल्या आमदार खासदाराला परत बोलवता येत नाही म्हणे, मग तो जर असा अकार्यक्षम ठरत असेल तर एक होऊन धडा शिकवा त्याला.
नुसती आमची मुंबई नको हो. ही मालिका चालू राहू नये असे वाटतय ना? मग सरकारला तुमचे अन तुमच्या हितांचे, घराचे संरक्षण करायला भाग पाडा. वर्तमानपत्रांनी किती कंठशोष केला तरी लोक दुर्लक्ष करीत आहेत अन करतील हीच भिती आहे. सहनशीलता सोडा अन काही निर्णय घ्या.
Truely Amazing.. I had got goosebumps when I had first read it. And right now almost 4 years i got them again..
its impressive to the core...
but there lies so much more..
its for us to open our eyes to them...
bcoz even those small things cause mayhem...
Yeah, true...
very true .. good one.
very true.. good one..
Post a Comment