मनाच्या आत, खोल खोल जात
उमजेना, गवसेना... !
मनाच्या आत, दिशाहीन वाहत,
दिसेना अन कळेना
भिर भिर तळमळ
आणि एक अपरिचीत उत्तर
नको नकोसं, हव हवसं
हळू हळू अन भरभर
एक वेडं हसू, एक शहाणा आसू
अर्थ त्याचा कळेना
माझे स्वतःचे होते जे जे
हिशोब काही जुळेना !