Image : Original "Forward" :P
Text : My Reply
My Reply
हाय किरण ,
लव्ह लेटर वाचून मला असं वाटलं की जणू काही मला गणितात शंभर मार्क मिळाले ... तू काल जेव्हा सायकल वरून माझा पाठलाग करत होतास तेव्हा मी खूप घाबरले होते ... पण तू हे पत्र मला ओंकारेश्वरच्या पुलावर दिलेस , मी लहानपणापासून त्या देवळात जाते ...
पत्र वाचून मी लाल रिबीन टाकून दिली , आईने सायकल मध्ये हवा भरायला जो रुपया दिला होता त्यातून निळी रिबीन घेतली आहे ... आणि आई म्हणते , " रंगापेक्षा गुण महत्वाचे " , माझा नेहेमी पहिलाच नंबर येतो ... असो !
मला घरी सगळे सूनु म्हणतात ... लाडाने , असो !
मी तुला हे पत्र देईन की नाही माहित नाही , पण तुझं नाव मी सरांना सांगणार नाही ह्यातून तू काय ते समजून घे ...
बाकी उद्या तू शाळेत लौकर येऊन माझ्या शेजारच्या बाकावर बसावस अशी प्रार्थना मी ओम्कारेश्वाराला केलीच आहे..
सुनीता उर्फ सूनु ...