एकदा सहज ठरवलं ,
तुला वजा केलं तर आयुष्यातून....
तू नाहीस ... आठवणी नाहीत ,
काढून टाकायचं मनातून .....
काय फरक काय पडतोय..
सूर्य तोच , चंद्र तोच.....
बदलतं का काही.....?
दिवस तोच , रात्रही तीच!
फूल उमलायचं रहातं का ?
पाऊस पडायचा रहातो का ?
वारा वहायचा रहातो का ?
काळ सरायचा रहातो का ?
कणा-कणानं आयुष्यं सरतं,
श्वासही त्याच्या तालात चालूच.....
पण का कोण जाणे अवेळी.....
डोळ्यात पाणी येते हळुच..!
न बोलुनही ....शेवटी परत परत..
आठवण येते रे सारखीच...
अगदी स्वप्नात सुद्धा रात्री...
तुझी साथ हवीच !
हवास तू सोबत ...
शांत चांदण्यात फिरताना....
सावली व्हावीस माझी....
दाहक उन्हातुन चालताना...
फ़ुलात .... पानात....
पावसात आणि ... वार्यात.......
खरं सांगू का ?
हात तुझाच हवा हातात...
क्षण तुझा , हर एक कण तुझा....
कळलंच नाही कधी...पण असंच आहे आता....
वजा करुनही जेव्हा तुच आलास हाताशी......
खरंच जीवात जीव आला होता...!!!!!!!!!!
आता अगदी सहज म्हणून पण...
तुला "वजा" करणार नाही.....
नाहीतर आयुष्यात माझ्या......
काही "बाकी" उरणार नाही......:-)
सायली मराठे